Wednesday, December 21, 2011

कसा बसा संपतो दिवस.....किवा संपवायला जमत म्हणायच....रोजच्या सारखा... आड रात्री भिंतिंच्याही नकळत दाट अंधारात रिमोट ची बटणं दाबत बसलेली ती... सोफ्याच्या हँडरेस्ट वरुन बीनबोभाट जमिनीवर लोळणारे केस... नीर्विकार सोफ्यावर पसरून तिचा भराभर चॅनेल बदलण्याचा अस्वस्थ कार्यक्रम चाललेला..... आणि अचानक काहीसे आठवून अस्वस्थ झॅलेली ती....टी वि चा वॉल्यूम मूट...क्षणात तडकन उठून बसली...हाताने काही चाचपडून मोबाइल शोधू लागते... कसा बसा दूर सोफ्याच्या खाली मागून पडलेला मोबाइल हाताला लागतो... नंबर डाइयल करते...आणि घड्याळ पाहते...3:30...गाढ झोपेत असणार.....श्या...राहिलाच फोन करायच... उद्या सक्काळी करूया ... म्हणत पुन्हा रेमोटशी खेळ सुरु झाला ...आता तर चान्नेल्स फस्त फोर्वार्ड होवू लागली ....आणि डोळा लागला ... कसला काहूर माजला होता कुणास ठावूक तिच्या मनात ....होता खरा ...मग उगाच स्वतःशीच वाद सुरु होतात ...होते नव्हते ...खरे खोटे ...वाटले खटकले ... असेल नसेल ...एक न अनेक ... सांगण्याची कधी तिला गरजच वाटली नाही ....सगळा अध्यारूत असतं म्हणे ह्यांच्या नात्यात ...तिने गोष्टी फक्त करायच्या ...काळज्या करायच्या .....प्रेम करायचे ...भांडणं करायचे .....मनधरणी करायची .... पण सगळं अगदी मनापासून ...कोणाला शंकाच नवती ...आणि आपल्यांच्यात बोलून दाखवायची पद्धत नसते न ...म्हणून अध्यारूत ...दोन्हीकडून .... जेवढे ती करेल तेवढेच तिच्या साठी सुधा ठरलेले ...चिंता आहे ...प्रेम आहे ...वाद आहेत ...लोभ आहेत ... आणि मग सगळे पूर्ववत ...येरे माझ्या मागल्या ... अचानक काय झाला कोणास ठावूक ...कारण तसे फारसे विशेष महत्वाचे नव्हते ...निमित्त झालं खरंतर ...चिडली म्हणे एकदम ...rather दुखावली ....hurt झाली खरच ... मग काय ... शांतता ......शांतातेचेही दोन प्रकार ...हवी हवीशी वाटणारी ...आणि नक्को होणारी ...हि शांतता दुसऱ्या प्रकारातली ...त्रासदायक .... बंद ...विचार बंद ...विषय बंद .....बोलणं बंद ...सगळं बंद ... खूप दुखला दोघानाही ...शांततेची सवय फार वाईट हो ......व्यसन सुटेल एकदा पण हि सवय सुटणे कठीण ... आता ठरवून तिच्याशी बोलायचं ठरला ...ती नसली बोलत तरीही ...इकडून तिकडून विषय काढून .....रोजच्याच गप्पा पुन्हा पुन्हा मारून ... हि आपली गप्प ...तेवढ्यास तेवढे ...पण मनाला जाम खटकत होती तिच्याही शांतता ... ऑफिसला निघाली सकाळी आज तेवा कॉर्नेरवर सोडा म्हणाली .....बस घेईन तिकडून..... कॉर्नर वर उतरून ...गाड्यांच्या भावू गर्दीत अथक प्रयत्नांनी सिग्नल ओलांडला ...तिने सहज मागे वळून पहिला .......कालाजीतले .तिच्या भोवतालच्या गाड्यांचा अंदाज घेत...आणि एक टक तिच्याकडे जेईस्तोवर डोळे दूरवर तिच्यावर खिळलेले ....ती जागीच स्तब्द ....तिचे डोळे पाण्याने डबडबले ...क्षणभर सुचेच ना काही तिला ..... बस समोर येवून बस मधेय चढे स्तोवर तिची आपली भिरभिर ... ती बस मधेय ... conductor: तिकीट ... ती - डोळ्यातून पाझर ..... तेवढ्यात फोन वाजला ...मिळाली का ग बस ? ती --- थांबला आहात ना अजून तुम्ही ... : हो तर ...तुला पाहत होतो मी ...पहिला नाहीस का तू ? ती - पहिला तर ....असाच पाहत राहिला असाल ना तुम्ही माझ्याकडे ...डॉक्टरने पहिल्यांदा तुमच्या हातात आणून दिलं मला तेव्हा? ... (तिचा आवाज अनिच गहिवरला )...बसले मी ...भेटू परत ...कधी याल पुह्ना ? :आता नाही ठावूक ...नाही आवडला मला ...बोलालीस्च नाहीस माझ्याशी ह्या खेपेला .....जमणार आहे का बोलायला तुला ...असो ...चाल निघ आता तू ...संध्याकाळी बोलू ... आणि हो ....२ तास फक्त पाहत होतो एकटक तुझ्या कडे .....कोणा कडेही दिले नव्हते तुला एक दिवस भर ... तोच ग एक दिवस मिळाला आज पर्यंत तुला आणि मला एकत्र ...खूप काही सांगायचा होता तुला ....बाकीचे दिवस आले आणि गेले .....असू देत ...गप्पा पुरे .... जमला तर बोलू .....म्हणजे तुला जमला तर ...अच्छा ... ती :(बंद झालेल्या फोन च्या स्क्रीन कडे पाहत...) जमेल कि .....जमायला सगळं जमेल हो .....